कोरेगावला एमआयडीसी नेली तर मंत्रालयावर मोर्चा काढू : शिवसेनेचे नेते शेखर गोरे


दैनिक स्थैर्य । दि. ०५ सप्टेंबर २०२२ । सातारा । माण तालुक्याचा विकास आम्हाला करायचा आहे. माण तालुका आम्हाला सदन करायचा. तालुक्यातील जनतेच्या हाताला रोजगार द्यायचा आहे. या तालुक्यातून नवीन महामार्ग जात आहे. एमआयडीसीही म्हसवडला मंजूर झालेली आहे. असे असताना जर कोणी आमच्या म्हसवडची एमआयडीसी कोरेगावला नेण्याचा प्रयत्न करत असेल तर तो आम्ही खपवून घेणार नाही. माण तालुक्याच्या अस्मितेसाठी मंत्रालयावर शिवसेनेच्यावतीने विराट मोर्चा काढून दाखवून देवू, असा इशारा शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनी दिला असून दरम्यान, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे आणि आमदार जयकुमार गोरे हे दोघेही एकाच माळेचे मणी आहेत. लोकांना वेडे बनवण्याचा दोघांचा व्यवसाय आहे, असाही टोला शेखर गोरे यांनी पत्रकाद्वारे लगावला आहे.

म्हसवड येथील एमआयडीसीला स्थगिती देवून कोरेगाव भागातच ती उभारण्याचा फलटण, कोरेगाव येथील लोकप्रतिनिधींनी घाट घातला आहे. म्हसवड ऐवजी कोरेगाव येथेच एमआयडीसी उभारण्याबाबत मुंबई येथे संबंधित कार्यालयात वरीष्ठ स्तरावर अधिकाऱयांची बैठक होणार होती. गेली कित्येक वर्ष त्यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे, माण तालुक्यातील जनता सोशीक आहे. कष्टाळू आहे. जनतेच्या हाताला काम मिळावे, रोजगार मिळावा यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे. विद्यमान आमदार जयकुमार गोरे आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे दोघे एकाच माळेचे मणी आहेत. एकाने मारल्यागत करायचे आणि दुसऱयाने रडल्यागत करायचे. या दोघांच्या शाब्दीक नाटय़ामध्ये माण तालुक्यातील जनता मात्र उपाशी मरत आहे. दोघांनाही सर्वसामान्य जनतेच्या सुखदुखाचे घेणेदेणे नाही. दोघेही सत्तेच्या हव्यासाला हपालेले आहेत हे त्यांच्या चालण्यावागण्यावरुन दिसते. आज माण तालुक्याला चांगले दिवस येवू लागले आहेत. मंजूर असलेल्या एमआयडीसीमुळे उद्या येथील जनतेला रोजगार मिळणार आहे. तालुक्यातील जनता सुखी होणार आहे. हे या दोघांनाही बघवत नाही. माण तालुक्याला मंजूर असलेली एमआयडीसी कोरेगावाला नेण्याचा या सरकारचा डाव आहे. सरकार कोणाचे का असेना माणच्या विकासामध्ये कोणी आडवे येत असेल तर सामान्य नागरिकांना घेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा शेखर गोरे यांनी दिला आहे.

जिल्हा बँकेत खासदार आमदारांनी का रामराजेंना पाठींबा दिला

जिल्हा बँकेच्या निवडणूकीवेळी अख्खे पॅनेल टाकणार म्हणणारे आमदार जयकुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांनीही अचानक यु टर्न घेत त्या निवडणूकीतून का माघार घेतली तर रामराजेंना पाठींबा देण्यासाठी हे न समजण्याऐवजी जनता दुधखुळी नाही. म्हणजेच तुझं माझं जमेना आणि तुझ्याविना करमेना अशी गत आमदार जयकुमार गोरे आणि रामराजेंच्यामध्ये आहे, असाही टोला शेखर गोरे यांनी लगावला आहे.


Back to top button
Don`t copy text!