माझा पराभव झाला, तर २० दिवसांत अमेरिकेवर चीनचा कब्जा : ट्रम्प

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, वॉशिंग्टन, दि.१६: यंदाचे वर्ष संपण्यापूर्वी कोरोनावरील सुरक्षित आणि प्रभावी लस उपलब्ध होईल, असे आश्वासन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. याचबरोबर, आगामी निवडणुकीत पुन्हा निवडूनआलो, तर आशा, संधी आणि विकास आणखी पुढे घेऊन जाण्याचे आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉर्पोरेट जगाला दिले. 

याशिवाय, डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला की, ‘चीनने जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार केला आहे आणि याला फक्त ट्रम्प प्रशासनच याला उत्तर देऊ शकते. मात्र, जर मी निवडून आलो नाही, तर २० दिवसांपेक्षा कमी कालावधीत अमेरिका चीनच्या ताब्यात जाईल.’ 

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून न्यूयॉर्क, शिकागो, फ्लोरिडा, पिट्सबर्ग, शोबॉयगन, वॉशिंग्टन डी.सी. च्या इकॉनॉमिक क्लबला संबोधित केले. यावेळी अमेरिकेसमोर एक सोपा पर्याय आहे. हा पर्याय माझ्या अमेरिकी समर्थक धोरणांनुसार ऐतिहासिक समृद्धी आहे की कट्टर डाव्या विचारसरणीनुसार प्रचंड दारिर्द्य आणि मंदी आहे, ज्यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. 

विरोधी उमेदवार ज्यो बायडन यांनी आपल्या भाषणात राष्ट्राध्यक्षपदाचे माजी रिपब्लिकन उमेदवार मिट रोमनी यांचे नाव कसे विसरले, याची आठवण डोनाल्ड ट्रम्प यांनी करून दिली. यावेळी ‘हे अविश्वसनीय आहे. ही एक वाईट गोष्ट आहे. हे अत्यंत लाजिरवाणे आहे. जर ते जिंकले तर सत्ता कट्टर डाव्यांच्या हातात जाईल आणि ते देश चालवणार नाहीत,’ असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. 

याचबरोबर, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘आम्ही जिंकू आणि आणखी चार वर्षे व्हाइट हाऊसमध्ये राहू. ही निवडणूक एक सोपा पर्याय आहे. जर ज्यो बायडन जिंकले तर चीन जिंकेल. चीनसारखे इतर सर्व देश जिंकतील. सर्वजन आपल्याला नुकसान पोहोचवतील. जर आम्ही जिंकलो, तर तुम्ही जिंकला, पेन्सिल्व्हेनिया जिंकला आणि अमेरिका जिंकला. हे खूप सोपे आहे.’


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!