पुसेगाववरून सातारला जाताय तर हे वाचा; कोरेगावमध्ये वाहतुकीत बदल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 28 डिसेंबर 2023 | फलटण | कोरेगाव शहरामधून जाणाऱ्या सातारा ते पंढरपूर या राज्य महामार्गाचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाययोजना म्हणून वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जारी केले आहेत.

राज्य महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत 28 डिसेंबर 2023 ते 5 जानेवारी 2024 पर्यंत सकाळी 6.00 ते रात्री 22.00 या कालावधीमध्ये एस.टी. बसेस व ऊस वाहतूकीची वाहने वगळून अवजड व हलक्या वाहनांच्या बाबतीत खालीलप्रमाणे वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.

सातारा बाजूकडून पुसेगाव बाजूकडे जाणारी अवजड वाहने बॉम्बे रेस्टॅारंट, अजिंठा चौक सातारा, रहिमतपूर, चौकीचा आंबा, विसापूर फाटा मार्गे पुसेगाव बाजूकडे जातील. पुसेगाव बाजूकडून सातारा बाजूकडे जाणारी अवजड वाहने पुसेगाव, विसापूर फाटा, चौकीचा आंबा, रहिमतपूर मार्गे सातारा बाजूकडे जातील.

सातारा बाजूकडून पुसेगाव कडे जाणारी हलकी वाहने कोरेगाव शहरातून जातील तर सातारा बाजूकडून पुसेगाव बाजूकडे जाणारी हलकी वाहने  कुमठे फाटा – कुमठे गाव – तडवळे रोड- जळगाव रोड जळगाव नाका मार्गे सातारा बाजूकडे जातील.

पुसेगाव बाजूकडून रहिमतपूर बाजूकडे जाणारी हलकी वाहने कुमठे फाटा येथून कुमठे गाव तडवळे रोड, जळगाव रोड व तेथून जळगाव नाका मार्गे कोरेगाव शहरातून हिंदभवन चौक येथून रहिमतपूरकडे जातील. सातारा बाजूकडून रहिमतपूर बाजूकडे जाणारी हलकी वाहने कोरेगाव शहरातून हिंदभवन चौक येथून रहिमतपूरकडे जातील.

कोरेगाव शहरातून जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर हिंदभवन चौक ते जळगाव नाका पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो पार्किग झोन राहील, वळविण्यात आलेल्या सर्व ठिकाणी दिशा दर्शक फलक व पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वाहतुक मार्गात केलेल्या बदलांची नोंद घेवून पोलीस दलास नागरीकांनी सहकार्य  करावे.असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. शेख यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!