दैनिक स्थैर्य । दि. ०४ सप्टेंबर २०२२ । फलटण । शिक्षक दिनाच्या निमित्ताने माजी आमदार व जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक स्व. चिमणराव कदम यांनी सुरु केलेल्या “आदर्श शिक्षक पुरस्कार” संभारंभाचे आयोजन जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आलेले आहे. यामध्ये फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या पुढील पिढी घडवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सह्याद्री चिमणराव कदम यांनी दिली.
माजी आमदार स्व. चिमणराव कदम हे फलटण तालुक्यामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ आयोजित करीत होते. त्यानंतर मधील काही कालावधी त्यामध्ये खंड पडला होता. माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांच्या प्रेरणेने फलटण तालुक्यात आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ पुन्हा एकदा सुरु करण्यात येत आहे. त्यानिमित्त फलटण तालुक्यातील शिक्षकांसह सर्वांनीच उपस्थित राहावे, असे आवाहन सह्याद्री चिमणराव कदम यांनी केले आहे.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून दि. ०५ सप्टेंबर रोजी सायं. ४ वाजता फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयामध्ये “आदर्श शिक्षक पुरस्काराचे” वितरण समारंभामध्ये होणार असल्याचेही यावेळी सह्याद्री चिमणराव कदम यांनी स्पष्ट केले.
सदरील कार्यक्रम हा जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सह्याद्री चिमणराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, फलटण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शाहीन पठाण यांची प्रमुख उपस्थिती संपन्न होणार आहे.