स्थैर्य, फलटण, दि.३१ (स्मृतिदिन विशेष) :
कै.वसंतराव साधुराव कणसे (बापू) यांचा आज 12व्या पुण्यस्मरण दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा….
बापूंचा राजकीय तसेच सामाजिक चळवळीतील नेते म्हणून लौकीक केला जातो. राजकारणात सक्रीय असल्यामुळे त्यांनी गुणवरे ग्रामपंचायतीचे सरपंच, तसेच श्री.भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटी, गुणवरेचे चेअरमन तसेच सातारा जिल्हा परिषदेचे 11 वर्ष सदस्य पद भूषविले. त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. ते गरीब व श्रीमंत मानत नसत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळेच त्यांना आपल्या गावात (गुणवरे) विविध योजना आणता आल्या. जनमानसातील जबरदस्त संपर्क आणि कामाची आवड असल्यामुळे त्यांना विविध पदे मिळवता आली.
आपल्या (गुणवरे) गावातील मुला – मुलींसाठी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी गुणवरे ची स्थापना दिनांक 29/01/1979 रोजी केली व लगेच जून 1979 रोजी कै.संजय गांधी विद्यालय गुणवरे सुरु केले. यातून गावातील व शेजारील गावातील गोरगरीब मुलामुलींसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. यामुळे आज अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी अधिकारी झालेले दिसत आहेत तर काही विध्यार्थी विध्यार्थिनी चांगल्या पदावर नोकरी करीत आहेत. त्यामुळे गुणवरे गावाची ओळख अधिकारी वर्गाचे गाव म्हणून होत आहे.
त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव राहुल वसंतराव कणसे संस्थेची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांनी संस्थेच्या मठाचीवाडी विद्यालय मठाचीवाडी या विद्यालयासाठी जागा घेऊन सुसज्ज इमारत उभी केली आहे. तसेच संस्था प्रगतीपथावर नेहण्यासाठी संस्था पदाधिकारी तसेच गुणवरे व मठाचीवाडी गावाचे ग्रामस्थ, माजी विध्यार्थी, दोन्ही विद्यालयाचा स्टाफ यांच्या सहकार्याने वाटचाल करित आहेत.
ज्यांनी आपले आयुष्य हे जनसेवा करण्यासाठी घालवले अशा बापुंना; गोरगरीब विद्यार्थ्यांना अशीच मदत करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.