साताऱ्यात मंत्री अब्दूल सत्तार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला; महिला कार्यकर्त्यांनी मारले पुतळय़ास जोडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ नोव्हेंबर २०२२ । सातारा । राज्याचे कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याचे तीव्र पडसाद साताऱ्यात उमटले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी तातडीने सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवून घेवून सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास मंत्री अब्दूल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळय़ास अगोदर महिलांनी जोडे मारुन खाली तुडवत पेटवून दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी निम का पत्ता कडवा है..अब्दूल सत्तार भडवा है, सुप्रियाताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत निषेध केला.

राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांना मंत्री अब्दूल सतार यांनी शिवीगाळ केल्याचे समजताच सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठांकडून सुचना मिळताच लगेच पदाधिकाऱ्यांना फोनाफोनी झाली अन् राष्ट्रवादी कार्यालयात सायंकाळी सहा वाजता सर्व पदाधिकारी एकत्र आले. त्यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष संमिद्रा जाधव, स्मिता देशमुख, पूजा काळे, विद्यार्थी सेलचे अतुल शिंदे, गोरखनाथ नलावडे, सनी शिर्के, अजित बर्गे, सागर कुंभार, सागर पवार, सचिन जाधव, प्रथमेश पवार, विकी भंडलकर, शंकर जगताप यांच्यासह पदाधिकारी यांनी एकत्र येवून जोरदार घोषणा देत प्रतिकात्मक मंत्री अब्दूल सत्तार यांच्या पुतळय़ास जोडे मारत पेटवून निषेध नोंदवला.

तेजस शिंदे म्हणाले, या खोके सरकारमधील एक मंत्री अब्दूल सत्तार यांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पद्धतीवर जावून टिका करणे आणि शिवीगाळ करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यांच्या नेत्यांनी त्यांना काय शिकवले आहे काय?, ते कोणत्या संस्कृतीतून येते हे स्पष्ट दिसून येते. त्यांनी ताबडतोब माफी मागावी, परत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याबाबत टीका केली तर जशास तसे उत्तर देवू असा इशारा दिला.

स्मिता देशमुख म्हणाल्या, अब्दूल सत्तार यांनी जे विधान केले ते अतिशय लज्जास्पद आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निषेध करतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाघिणी २४ तासात माफी अब्दूल सत्तार यांनी माफी मागितली नाही तर महाराष्ट्रात त्यांनी आम्ही फिरु देणार नाही.


Back to top button
Don`t copy text!