आयसीसीला मिळाला नवा अध्यक्ष; मतदानात ‘या’ व्यक्तीने मारली बाजी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.२७:  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष शशांक मनोहर हे
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचेही (आयसीसी) अध्यक्ष होते. जुलै 2020 मध्ये
त्यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे आयसीसीचे अध्यक्षपद
रिक्त होते. या रिक्तपदासाठी नुकतेच मतदान पार पडले.

ग्रेक बार्कले यांची अध्यक्षपदावर झाली निवड

न्यूझीलंडचे ग्रेक बार्कले आणि सिंगापूरचे इम्रान ख्वाजा हे दोन व्यक्ती
अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. मात्र नुकत्याच झालेल्या मतदानात विजय
मिळवून ग्रेक बार्कले यांनी ही शर्यत जिंकली आहे. त्यामुळे बार्कले
आयसीसीचे नवे अध्यक्ष असतील.

वेश्याव्यवसायातील महिलांना राज्य शासनाचा मोठा दिलासा, ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान दरमहा 5 हजारांची मदत

बार्कले सन 2015 मध्ये होते आयसीसीचे संचालक

बार्कले हे पेशाने वकील आहेत. सन 2012 मध्ये त्यांची न्यूझीलंड
क्रिकेटचे बोर्डाचे डायरेक्टर म्हणून निवड झाली होती. सन 2015 मध्ये ते
आयसीसीचे संचालक देखील होते. आयसीसीचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांची मुदत
यावर्षी जुलैमध्ये संपली होती. त्यानंतर इम्रान ख्वाजा यांना अंतरिम
अध्यक्ष केले गेले होते.

आयसीसी बोर्डावर होते कार्यरत

ग्रेग बार्कले हे आयसीसी बोर्डावर न्यूझीलंड क्रिकेटचे प्रतिनिधी होते.
परंतु आता ते या पदाचा राजीनामा देतील आणि आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारतील.

अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली यांचेही नाव होते चर्चेत

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचेही नाव या शर्यतीत घेतले जात
होते. जगभरातील बर्‍याच माजी खेळाडूंनी त्याचे समर्थनही केले होते.

आयसीसीच्या मतदानात विजय मिळवण्यासाठी उमेदवाराला दोन-तृतीयांश मतं घ्यावी लागतात.

“आमचं चुकलंच,” अजित पवारांनी मान्य केली चूक


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!