स्थैर्य, सांगली , दि .21: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटलांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, ‘अनेक वर्षांपासून राजकारणात असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत असते. त्यामुळे, मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल. पण, आमच्या पक्षाचे संख्याबळ लक्षात घेता ते सध्या ते शक्य नाही. आतापर्यंत राष्ट्रवादीचा एकही मुख्यमंत्री झाला नाही. पक्षाचा मुख्यमंत्री करायचा असेल तर अजून पक्ष वाढवण्याची गरज आहे. सध्या आमच्या पक्षाच्या आमदारांची संख्या केवळ 54 आहे. त्यामुळे पक्षाच्या आमदारांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. भविष्यात असे झाले तर पवार साहेब जो काही निर्णय घेतील त्यावर मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचे हे अंतिम असेल आणि तो आम्हाला मान्य असेल. पण, मला मुख्यमंत्री व्हावे असे वाटणे, यात काही गैर नाही, असे पाटील म्हणाले.’