मी राजीनामा द्यायला तयार ; पण, समोर येऊन बोला – उद्धव ठाकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२२ । मुंबई । मी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी तयार पण, समोर येऊन बोलावे असे शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी यूट्यूब वरून लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधताना सांगितले आहे.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे बोलण्यासराख बरेच आहे. कोविड काळात लढाई लढलो. कठिण काळात कोणीही तोंड दिले नाही अश्या परिस्थितीत मला जे कराचे ते प्रमाणिक पणे केले. तेव्हा देशातील पहिल्या पाच मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून आपली गणना झाली. माध्यमात अनेक अफवा आहे की, मी भेटूत नव्हतो हे काही दिवसा पुर्ते खरे आहे. कारण माझी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर पहिली कॅबिनेट रूग्णालयातून केली. शिवसेना हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही म्हणूनच आदित्य, मंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला गेले. हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री असेल. ही बाळासाहेबांची शिवसेना नाही अशी बातमी पसरविण्यात आली. सन २०१४ एकट्याच्या ताकदीवर ६३ आमदार शिवसेनेचे आमदार निवडून आले ती पण हिंदुत्वावर. शिवसेना कुणाची बाळासाहेबांची पण मधल्या काळात जे मिळाले ते याच शिवसेनेने कडून मिळाले.

# आमदार गायब.
काही आमदारांचे फोन येतात. काल परवा निवडणुक झाली. हॉटेल मध्ये गेलो तेव्हा बोललो ही कुठली लोकशाही. शंका ठिक पण लघु शंकेला गेला तरी शंका. मी इच्छेपेक्षा जिद्दीने पूर्ण करणारा आहे. कुठलाही अनुभव नव्हता. नाईलाजाने वेगळा मार्ग घ्यावा लागला. विशेषतः पवार साहेबांनी सांगितले जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. पवारांचा सोनियाजींचा आग्रह म्हणून जिद्द केली. नुसता स्वार्थ नव्हता. वळणदार राजकारण कुणाचेच उपयोगाचे नाही. प्रशासनाची खूप मदत मिळाली.

# धक्का हो धक्का.
सत्तेसाठी एकत्र आलो. सकाळी कमलनाथ पवारांचा विश्वास. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे ? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला ? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की, मी मुख्यमंत्री नको तर मी सोडायला तयार. आज मी वर्षावर मुक्काम हलवतोय. पण हे समोर येऊन बोला.

# कुऱ्हाडीची गोष्ट : ज्याने घाव घातल्या जाताहेत त्याच्या वेदना अधिक.
शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका. मला कोविड झालाय मी राजीनामा देतो तुम्ही येऊन घेऊन जा. हे काय मोठे आव्हान आहे. शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. संकाटाला सामोरा जाणारा शिवसैनिक. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी.

एकदा ठरवू या समोर या ! सांगा आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी सोडायला तयार आहे. आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण, संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो. एकच सांगतो तुमचे प्रेम असे ठेवा.


Back to top button
Don`t copy text!