मीच माझा रक्षक : कराड शहर कृतीसमितीची बैठक संपंन्न झाली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कराड, दि. २७ (प्रमोद गरगटे) : कोरोनाशी लढा देताना आता दूसऱ्या टप्प्यात बाहेर गावहून येणारे नागरीक व त्यांचे बरोबर येणारे कोरोनाचे संकट यावर उपाययोजने बाबत कराड येथिल यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन येथे बैठकीचे आयोजन केले होते.

सध्या कराड शहरामध्ये कोरोनाचा एकही पेशंट अथवा संशयित नाही. प्रशासनाने केलेल्या उपाययोजना व कराडकरांनी दिलेली साथ या बाबत समाधान व्यक्त करण्यात आले.

बैठकीसाठी मा.प्रांताधिकारी उत्तम दिघे , मुख्याधिकारी यशवंत डांगे, कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटीलसाहेब, कराडाच्या नगराध्यक्षा रोहीणी शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

बैठकीसाठी कराडचे नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते व्यापारी व पत्रकार उपस्थित होते. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी मीच माझा रक्षक योजना आमलात आणण्याचे मनोगत व्यक्त केले व त्यासाठी १२ कलमी उपाययोजना राबवून येणाऱ्या काळात कराड शहर व परिसर कसा सुरक्षित राहील आणि त्यासाठी कराडमध्ये प्रभाग निहाय समित्या कार्यरत करण्याचे ठरविले असून त्यामधे नगरसेवक  त्यांचे कार्यकर्ते  नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी एकत्रितपणे काम करावे असे मत व्यक्त करण्यात आले. या पुढे पुणे, मुंबई व इतर बाहेरुन येणारे नागरिक यांनी प्रशासनाला स्वतःहून कळवावे तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या जवळच्या परिसरामध्ये नविन कोणी आल्याचे समजल्यास प्रशासनाला कळवावे प्रशासन याची योग्य ती दखल घेईल असे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी सांगितले. कराडमध्ये येणाऱ्या सर्व मार्गावर चेकपोष्ट केली जातील व तेथे काळजीपूर्वक लक्ष दिले जाईल  यासाठी पोलीस प्रशासनाबरोबर नगरपरिषद व नगरसेवक यांनी सहकार्य करावे  तसेच ज्यांच्या हातावर होम क्वारंटाइन शिक्के मारले आहेत ते बाहेर फिरताना दिसले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल व दूचाकीवर डबलसिट बसणे, चार चाकीमधे चालक आधिक दोन यापेक्षा जास्त बसणे. दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई चालू आहे.

कराडची बाजारपेठ सुरु होवूनसुद्धा नागरिक गर्दी न करता व्यवहार करताना दिसत आहेत मात्र भाजी मंडईच्या ठिकाणी फारच गर्दी होताना दिसते त्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरले. बैठकीत  अनेक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी मांडलेल्या सूचनांचा विचार घेतला गेला.

सध्या कराडमधे तीन कंन्टेन्मेंट झोन केले होते त्यापैकी दोन कंन्टेन्मेंट झोन उठवण्यात आले आहेत व एक कंन्टेन्मेंट झोन लवकरच उठवला जाईल असे मत मुख्याधिकारी यशवंत डांगे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी दिले.

स्वताःहा स्वताःचे रक्षण करा. मीच माझा रक्षक या अभियानामधे सर्वांनी सामिल व्हा असा संदेश प्रशासनाने दिला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!