पसरणी घाटात दोन कारची धडक, पर्यटनाला आलेले पती-पत्नी व लहान मुलगी जखमी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, वाई, दि. ८: पसरणी घाटात दत्त मंदिराजवळ सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने महाबळेश्‍वरला पर्यटनासाठी आलेले पती- पत्नी व त्यांची लहान मुलगी जखमी झाली. पाथर्डी (अहमदनगर) येथील श्रीकांत नंदकुमार टेके हे आपल्या कुटुंबियांसह महाबळेश्‍वरला टाटा गाडी (क्र. एम एच 12 एस इ 6659) मधून फिरायला आले होते.

आज घरी परत जाताना पसरणी घाटात दत्त मंदिराजवळ वळणावर त्यांच्या गाडीची आणि वाईहून पाचगणीला जाणार्‍या मारुती  कार (क्र. एम एच 12 एफ एफ 2182) यांची धडक झाली. त्यामध्ये श्रीकांत टेके, त्यांची पत्नी व लहान मुलगी (दोघींची नावे समजली नाहीत) असे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी पाचगणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच वाईचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कदम व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची माहिती घेतली आणि वाहतूक सुरळीत केली.


Back to top button
Don`t copy text!