सौ. सीमा सुरेश भोईटे यांचे आकस्मित निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ एप्रिल २०२२ । फलटण । आरडगाव, ता. फलटण, हल्ली लोणंद येथील रहिवाशी वार्ताहर सुरेश भोईटे यांच्या पत्नी सौ. सीमा सुरेश भोईटे (वय ४० वर्षे) यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार, सौ. सीमा सुरेश भोईटे नेहमी प्रमाणे काम आटोपून घरातील फरशी पुसत असताना फ्रीजच्या खालील फरशी पुसताना त्यांना वीजेचा शॉक लागला. जोरदार आवाज आल्याने मुलगा व मित्र धावतच घरात आले त्यांनी तातडीने उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचे निधन झाले असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. सुरेश भोईटे शाळेच्या कामानिमित्त सातारा येथे गेले होते. स्वच्छ भारत अभियानात व सत्संगाच्या माध्यमातून विविध ठिकाणी स्वच्छतेसाठी प्रबोधन करणाऱ्या सौ. सीमा भोईटे यांचे स्वच्छता करतानाच निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचे पार्थिव आरडगाव, ता. फलटण येथे अंत्यदर्शनासाठी ठेवून आरडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेश भोईटे यांचे आप्तेष्ट, मित्र परिवार आणि मोठ्या संख्येने लोणंद, आरडगाव, फलटण येथून ग्रामस्थ, पत्रकार, शिक्षक सौ. सीमा भोईटे यांचे अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थित होते.

सर्वांशी प्रेमाने वागणाऱ्या, सतत हसतमुख असणाऱ्या सौ. सीमा भोईटे कुटुंबात सर्वांच्या आवडत्या होत्या. त्यांच्या निधनाने आरडगाव गावावर शोककळा पसरली आहे.


Back to top button
Don`t copy text!