हॉटेलमध्ये वेटरला ग्राहकांकडून मारहाण


दैनिक स्थैर्य । दि.२१ मार्च २०२२ । सातारा । मार्केट यार्ड, सातारा परिसरातील हॉटेल सुरभी येथे ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी राडा करत वेटरला मारहाण केली. ही घटना दि. १९ रोजी दुपारी घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.

याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, शैलेश पवार व सलीम पठाण (तक्रारदार यांना दोघांची पूर्ण नावे, वय, पत्ते समजू शकले नाहीत) या दोघांविरुध्द लक्ष्मण नाना ढवळे वय ४८, रा. करंजे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. जेवणाचे ताट पडल्यानंतर वेटर ते साफ करत असताना ‘आमच्याकडे काय बघतोस,’ असे म्हणत संशयितांनी मारहाण करत, शिवीगाळ केली. यावेळी इतर वेेटर यांनी मध्यस्थी करण्यासाठी आल्यानंतर त्यांनाही मारहाण झाली असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!