स्थैर्य, फलटण दि.८ : केंद्र शासनाने पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात आणि बळीराजाच्या न्यायहक्कासाठी देशातील विविध शेतकरी संघटना, कामगार संघटना, इतर संघटना आज दिनांक 8 डिसेंबर 2020 रोजी भारत बंद ठेवणार आहेत. या बंदमध्ये सहभागी होण्याचा महाराष्ट्र राज्य हॉटेल चालक मालक संघटनेने निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार फलटण शहर व तालुक्यातील सर्व हॉटेल व्यावसायिकांनी शांततेच्या मार्गाने, कायदा सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घेवून संपूर्ण दिवसभर आपली हॉटेल्स बंद ठेवून या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन फलटण हॉटेल असोसिएशनच्यावतीने हॉटेल आर्यमानचे प्रमुख तथा सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे समन्वयक महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांनी केले आहे.