दैनिक स्थैर्य । दि. 02 जुलै 2021 । फलटण । फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण या शाळेत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी सन 2019- 20 मध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी प्रोत्साहन देणार्या पालकांचाही गुलाबाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.
प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी –
1) कु. श्रुती निलेश कराळे-शिष्यवृत्तीधारक
2) कु. तेजस्वी दादासो रासकर- शिष्यवृत्तीधारक
3) ऋग्वेद मुरलीधर फडतरे-शिष्यवृत्तीधारक व सैनिक स्कूल साठी निवड
4) कु. आदिती शरद ननावरे-मुलींचे सैनिक स्कूल साठी निवड
कार्यक्रमास शाळेच्या स्कूल कमिटी व्हाईस चेअरमन सौ. नूतन अजितसिंह शिंदे, सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, वसुंधरा नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, अधीक्षक श्रीकांत फडतरे, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सर्व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक आदींची उपस्थिती होती.
यावेळी शाळेच्या नवीन वर्गखोल्या इमारतीचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
उपस्थितांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली जाधव यांनी केले. सूत्रसंचालन सौ. रुपाली कदम यांनी तर बक्षीस यादी वाचन सौ. सरीता आळंदे यांनी केले.