
दैनिक स्थैर्य | दि. १३ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
अत्यंत खडतर परिस्थितीला तोंड देत आपल्या मुलांना घडविण्याचे काम केलेल्या मातांना जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे हनुमान माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आणि गोखळी ग्रामस्थ यांच्या वतीने ‘आदर्श माता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
हनुमान विद्यालयाच्या प्रांगणात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोखळीच्या माजी सरपंच सुमन गावडे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी सौ. गुरव उपस्थित होत्या.
प्रारंभी श्री सरस्वतीच्या फोटोचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना बजरंग गावडे म्हणाले की, आपल्या देशाला कर्तृत्ववान महिलांची परंपरा आहे. राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, इंदिरा गांधी अशा थोर कर्तृत्ववान महिलांच्या परंपरेत वाढलेल्या मातांनी आपल्या मुलांना सुसंस्कृत, सुसंस्कारित बनविले आहे. या आदर्श मातांचा सत्कार हनुमान विद्यालयाच्या संकल्पनेतून होत आहे. या संकल्पनेबद्दल धन्यवाद दिले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी सौ. ए. एस. गुरव, तानाजी बापू गावडे, नंदकुमार गावडे, सौ. वैशालीताई गावडे-कोकणे, प्राचार्य सुनील सस्ते सर, मोहन ननवरे सर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास उपसरपंच सौ. वैशाली कोकणे-गावडे, सौ. मनिषा गावडे, सौ. अर्चना चव्हाण, सौ. स्वाती खरतोडे, सौ. शुभांगी भोसले- बोंद्रे, सौ. स्वाती भगत, बजरंग गावडे, प्राचार्य सुनील सस्ते, तानाजी बापू गावडे, मनोजतात्या गावडे, अमितभैया गावडे, अभिजीत जगताप, काशिनाथ गावडे, आकाश खटके, बंडू यादव, नंदकुमार गावडे, डॉ. अमित गावडे, हणमंत जगताप, आदित्य कोकणे, रमेशदादा गावडे उपस्थित होते.
यावेळी आदर्श माता म्हणून श्रीमती गिरीजाबाई रामचंद्र कदम, सौ. नंदा गजानन गावडे, सौ. शोभा राजेंद्र भागवत, सौ. विद्या तानाजी जगताप, श्रीमती सीमा गोकुळदास कांबळे, सौ. सविता रायाजी जगताप, श्रीमती इंदुबाई पांडुरंग माने, सौ. पुष्पावती ज्ञानदेव काशिद, सौ. पार्वती हरिभाऊ गेजगे, सौ. शिला महेश यादव, सौ. रुक्मिणी रत्नाकर जगताप, सौ. लतादेवी किशोर किर्वे, सौ. सुमन आप्पा बागाव, सौ. कुसूम बबन पवार, सौ.लता कुंडलिक घाडगे यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बिजवडी येथे आरोग्यसेविका म्हणून नियुक्त झालेल्या सौ. संध्या अरुण माने यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहन ननवरे, सुनील जाधव, विकास घोरपडे, किरण पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन ननवरे, राधेश्याम जाधव यांनी केले.