
दैनिक स्थैर्य । दि. ०८ एप्रिल २०२३ । बारामती । गुणवंत भूमीपुत्रांनी विविध क्षेत्रात रुई चे नाव उज्जवल केले त्यांना शाबासकी म्हणून त्यांचा सत्कार करून सेवा निवृत्ती नंतर सामाजिक सेवा व्हावी व त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा व गुणवतांचा सत्कार ही काळाची गरज असल्याचे प्रा. अजिनाथ चौधर यांनी सांगितले.
रुई गावामधील विविध क्षेत्रा मध्ये सेवा करून सेवा निवृत्ती झालेले व पदोन्नती मिळवलेल्या गावकऱ्यांचा सत्कार ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी प्रा अजिनाथ चौधर बोलत होते .
जम्मू काश्मीर येथे सेवा करून भारतीय सैन्य दल मधून निवृत्ती झालेले मेजर मनोज कांबळे, वालचंद नगर पोलीस स्टेंशन मध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक पदी सेवा निवृत्त झालेले बाळासाहेब पानसरे, बारामती ग्रामीण राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय चौधर, जिल्हा परिषद पुणे चे पशुसंवर्धन अधिकारी डॉ भारत चौधर,पोलीस क्षेत्रातील शरद कांबळे, यशवंत चौधर, गुलाब चौधर व तंटामुक्त अभियान पुरस्कार विजेते पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळालेले रतीलाल चौधर आदींचा सत्कार करण्यात आला .
शरद महाराज चौधर, धनाजी चौधर, दत्तू आबा चौधर,दत्तू दादा चौधर, शंकर आण्णा चौधर, रामहरी थोरात, ज्ञानदेव साळुंके आदी ज्येठाच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पिंटू बाबू चौधर, प्रा. बापू खाडे,अविनाश चौधर आदी नी मनोगत व्यक्त केले तर विविध क्षेत्रातील सत्कार पेक्षा गावचा सत्कार म्हतपूर्ण वाटतो व ऊर्जा देतो असे सत्काराला उत्तर देताना सत्कारार्थी यांनी सांगितले. आभार डॉ. राजाराम चौधर यांनी मानले