हराळे वैष्णव समाज संघाच्या वतीने अजित पवार यांचा सन्मान


दैनिक स्थैर्य । दि. ७ मे २०२२ । बारामती । दिनांक २८/०४/२००२ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकी मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजितदादा पवार, यांनी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे यापूर्वी असलेले भाग भांडवल ७३. २१ कोटी वरून भरीव वाढ करून ते १००० कोटी इतक्या मोठया रकमेची वाढ केली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील चर्मकार समाजाच्या विकासासाठी मोठी मदत होणार आहे.

त्यामुळे शनिवार ७ मे रोजी बारामती विद्या प्रतिष्ठान येथे येथे अजित पवार यांचे हराळे वैष्णव समाज संघ बारामती यांचे वतीने हार्दिक आभार व्यक्त करून सन्मान करण्यात आला. यावेळी हराळे वैष्णव समाजसंघाचे अध्यक्ष नितीन सुभाष आगवणे , उपाध्यक्ष पंढरिनाथ कांबळे, सचिव नागेश लोंढे , सदस्य भाऊसाहेब कांबळे , हनुमंत माने ,योगेश दुर्गे , दिपक सोनवणे , हनुमंत भोसले व कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!