योगग्राम म्हणून ओळखल्या जाणार्‍या सांबरवाडीत घरोघरी योगा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 21 : सातारा शहरसह जिह्यात आंतरराष्ट्रीय योगादिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनामुळे गर्दी करायची नाही. हा नियम असल्याने झूम ऍपवरुन संवाद साधत योगा करण्यात आला. योगग्राम म्हणून ओळखल्या जाणार्‍या सांबरवाडीत घरोघरी योगा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्ताने जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद शिक्षण विभाग व आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन योगाचे आयोजन करण्यात आले होते. शाहु क्रिडा संकुलात मोजकेच योगाशिक्षक जमले होते. त्यांनी झूम ऍपवरुन मार्गदर्शन केले. यास जिल्हा रुग्णालय सातारा, इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनाझेशन, आर्ट ऑफ लिव्हींग, पतजंली योग, हॅपी लाईफ फौंडेशन, गाथा योग साधना केंद्र, योग विद्याधाम सातारा, गुरुकृपा राजयोग चॅरिटेबल ट्रस्ट, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नगरस्थान सातारा, सातारा जिल्हा शारिरीक शिक्षण शिक्षक संघ सातारा यांनी सहकार्य केले. अनेकांनी या ऑनलाईन योगा दिनात सहभाग घेतला होता.

सातारा येथील योगग्राम असलेले सांबवाडी या गावात घरोघरी योगा करण्यात आला. महिलांनीही सहभाग घेतला होता. योगशिक्षक प्रल्हाद पार्टे यांनी मार्गदर्शन केले. योगाचे महत्व पटवून सांगताना ते म्हणाले, योगामुळे सकारात्मक उर्जा मिळते. चांगले विचार मिळतात. शरीर तंदुरुस्त रहाते, असे त्यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!