स्थैर्य, नवी दिल्ली, दि. ०९ : केंद्र सरकारने राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हे चौकशीचे आदेश दिले आहेत.
या चौकशीच्या समन्वयासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने मंत्री समितीची स्थापना केली आहे. सक्तवसुली संचालयानालयाचे (ED) विशेष संचालक या मंत्री समितीचे प्रमुख असणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने ट्वीट करत ही माहिती दिली. राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टने पीएमएलए कायदा, आयकर कायदा आणि एफसीआरएचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी या राजीव गांधी फाउंडेशन या संस्थेच्या प्रमुख आहेत. तर या फाउंडेशनमध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, राहुल गांधी, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि प्रियांका गांधीचाही समावेश आहे.