
स्थैर्य, नवी दिल्ली, दि.११: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गुरूवारी पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार आहे. यापूर्वी ते कुच बिहारमधून परिवर्तन यात्रेला हिरवा झेंडा दाखवत अनेक कार्यक्रमात सहभागी होतील. यानतंर सायंकाळी 3:45 वाजता ते पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगना जिल्हातील ठाकूरनगर येथील सभेला संबोधित करतील.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील ठाकूरनगर बंगाल राजकारणात महत्वाचा मानला जात आहे. ठाकूरनगर मटुआ समाजाचा गड मानला जातो. हे क्षेत्र बांग्लादेश सिमेपासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे.
दलित मटुआ समाजाचा 70 जागांवर प्रभाव
पश्चिम बंगालमध्ये दलित मटुआ समाज हा विधानसभा क्षेत्रातील 70 जागांवर पसरलेला आहे. काही जागांवर यांचा खुप मोठ्या प्रमाणावर प्रभाव असून, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या समाजाने आपले समर्थन भाजपाला दिले होते. बोनगाव मतदारसंघातून भापज उमेदवार शांतनु ठाकूर यांना समाजाने एकमताने निवडून आणत काँग्रेसच्या बाळा ठाकूर यांना पराभूत केले होते.
एप्रिल-में मध्ये होऊ शकतात निवडणुका
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक ही यावर्षी एप्रिल-मे महिण्यात होण्याची शक्यता आहे. भाजपचे राज्यसभा खासदार आणि मीडिया प्रभारी अनिल बलूनी यांनी सांगितले की, गृहमंत्री अमित शहा हे ऐतिहासिक श्री मदन मोहन मंदिरात जाऊन पुजा करणार आहेत. त्यानतंर ते कुच बिहार येथील रास मेला मैदानात परिवर्तन यात्रेतील दुसऱ्या फेरीला हिरवा झेंडा दाखवतील.
5 टप्पात भाजप काढणार परिवर्तन यात्रा
भाजप 5 टप्प्यात पश्चिम बंगालमधील परिवर्तन यात्रेच आयोजन करत आहे. यातून राज्यातील सर्व मतदारसंघ कव्हर करण्याचा विचार आहे. यात्रेला हिरवा झेंडा दाखवल्यानतंर गृहमंत्री उत्तर 24 परगाना जिल्हातील ठाकूरनगर येथील श्री हरिचंद्र ठाकूर मंदिरामध्ये पुजा करतील. यानंतर ते सार्वजनिक रॅलीला संबोधित करतील. यानंतर ते, कोलकातामधील सांयस सिटीचा दौरा करतील, जेथे ते सोशल मीडिया व्हॉलेंटिअरच्या बैठकीला संबोधित करतील.
गृहमंत्र्यांनी मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये केला होता दौरा
अमित शहांनी मागच्या वर्षी 19-20 डिसेंबरला पश्चिम बंगाल दौरा केला होता. त्यादरम्यान, तृणमूल नेते शुभेंदू अधिकारी यांच्यसह 35 नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानतंर शाह जानेवारीमध्ये बंगाल दौऱ्यावर जाणार होते. परंतु, दिल्लीमध्ये इस्राइल दूतावासाजवळ बॉम्ब स्फोट झाल्यानंतर त्यांनी आपला दौरा रद्द केला होता.