दैनिक स्थैर्य । दि. १६ जून २०२२ । बारामती । वटपौर्णिमा निमीत्त हळ्द कुंकू चे आयोजन करून वडाचे झाडाचे महत्व, पर्यावरण रक्षण , मुलगी वाचवा, मुलगी शिकवा आदी चे महत्व पटवून देऊण रुई मध्ये वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.
प्रमिला काकू साळुंके,लिलाकाकू चौधर,शोभा नानी कांबळे, जाणकाबाई सोन्ने, शालन चौधर, सविता चौधर, हिराबाई चौधर, मुक्ता चौधर आणि अलका राजाराम चौधर, रंजना अजिनाथ चौधर,सुजाता काशिनाथ चौधर आदी मान्यवर महिला उपस्तित होत्या.
महिलांनी, महिलासाठी आयोजित कार्यक्रमात सर्वसामान्य महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सदर कार्यक्रम चे आयोजन केले असल्याचे रंजना चौधर यांनी सांगितले.
या प्रसंगी वटपौर्णिमेचे उखाणे, पर्यावरण म्हणी,मनोरंजन,खेळ वर आधारित होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये प्रथम क्रमांक, शैला ननवरे द्वितीय प्रियांका खाडे, तृतीय अश्विनी खाडे उत्तेजनार्थ ललिता चौधर, अंजली नागरगोजे यांना पैठणी व नथ देऊन सन्मानित करण्यात आले.
उप्स्तीतचे स्वागत अलका चौधर, सुजाता चौधर यांनी केले. महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे,बक्षिसे जिकंण्याची संधी मिळावी गृहणी, नोकरदार, व मुली यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून रुई च्या इतिहासात प्रथमच महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे प्रा अजिनाथ चौधर यांनी सांगितले. होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सादरीकरण अनिल सावळेपाटील यांनी केले या मध्ये परिसरातील 500 महिलांनी सहभाग घेतला विजेत्यांना पैठणी व नथ देऊन सन्मानित करण्यात आले.