दैनिक स्थैर्य | दि. २१ जुलै २०२४ | फलटण |
विधानसभा निवडणूक ७० दिवसांवर येऊन ठेपली असताना होलार समाजाला फलटण-कोरेगाव मतदारसंघातून संधी मिळावी यासाठी होलार समाज आक्रमक झाला आहे. याअनुषंगाने समाजाचे ज्येष्ठ नेते अशोक गोरे यांच्या मार्गदर्शनाने होलार समाजाचे फलटण तालुकाध्यक्ष गणेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि उपाध्यक्ष ओमकार अहिवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत निरगुडी गावामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये फलटण तालुक्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये क्रमांक दोनचा होलार समाज आहे. सद्य:स्थितीत होलार समाजासाठी सकारात्मक वातावरण आहे. होलार समाज हा अत्यंत शांतप्रिय, सर्व जातीधर्मातील लोकांशी सलोख्याचे संबंध ठेवणारा समाज आहे.
राज्यामध्ये आजपर्यंत कोणत्याही पक्षाने लाखोंच्या संख्येत समाजाची लोकसंख्या असतानासुद्धा राजकीय प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली नाही, ही खंत महेंद्र गोरे यांनी यावेळी व्यक्त केली.
याबरोबरच संपूर्ण राज्यातून होलार समाजाचे फलटण-कोरेगाव अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लक्ष लागून राहिलेल्या मतदारसंघातून यावेळी कोणत्याही परिस्थितीत होलार समाज निवडणूक लढणार आणि या होलार समाजाच्या लढण्याच्या भूमिकेला इतर जातींचेसुध्दा समर्थन राहील. हे चित्र लवकरच दिसेल, असे महेंद्र गोरे यांनी स्पष्ट केले.
यावेळी ‘आमचं ठरलंय… आमदार आपलाच…’ असा आवाज होलार समाज बांधवांकडून देण्यात आला.
या बैठकीवेळी बट्याबापू गोरे, निलकुमार गोरे, लहू गोरे आणि भैरवनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष अजित गोरे यांनी उपाध्यक्ष ओमकार अहिवळे आणि योगेश गोरे यांचे स्वागत केले.
यावेळी सुनील गोरे, अनिल गोरे, अभिजीत गोरे, अक्षय आवटे, गणेश गोरे, शंभूराज गोरे, अमित आवटे, प्रविण गोरे, आदेश गोरे , अजित गोरे, आदित्य गोरे, विघ्नेश गोरे, समीर गोरे, अंकुश गोरे आदी उपस्थित होते.