दैनिक स्थैर्य | दि. ४ मार्च २०२४ | फलटण |
फलटण तालुका होलार समाज संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कलावंतांच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात संघटनेने पुढील मागण्या केल्या आहेत.
- गेल्या दोन वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील वयोवृध्द कलावंतांच्या मानधनाचे दाखल परंतु प्रलंबित असलेल्या अर्जांवर तात्काळ कार्यवाही करावी.
- कलावंत मानधन उत्पन्न अट ४८,०००/- ऐवजी किमान १,००,००० इतके करण्यात यावे.
- कलावंत मानधनासाठी ६० वर्षे वयाची अट शिथिल करून ४० वर्षे करावी.
- कलाकार मानधन योजनेसाठी दाखल बहुतांश प्रस्ताव आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल असणार्या वयोवृध्द कलावंतांचे असल्याने सर्व प्रस्ताव १००% मंजूर करावेत.
कलावंतांच्या वरील सर्व मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.
हे निवेदन देताना होलार समाज संघटनेचे फलटण तालुकाध्यक्ष गणेश गोरे, महेंद्र गोरे, सुनील जाधव, रमेश आवटे हे उपस्थित होते.