महाराष्ट्र दिनी सोलापूर जिल्ह्यात ९ ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे लोकार्पण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ मे २०२३ । सोलापूर । नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली आहे. जिल्ह्यात ९ ठिकाणी आपले दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. राज्यातील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या  जनसामान्य गोरगरीब नागरिकांसाठी वेळेवर व भक्कम आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी घोषित करण्यात आलेल्या या योजनेचे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोकार्पण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील आपला दवाखाना ठिकाणे पुढीलप्रमाणे – अक्कलकोट शहर – अक्कलकोट नगर परिषद, नगरपालिका मराठी शाळा, माणिक पेठ, अक्कलकोट, बार्शी शहर – बार्शी नगरपरिषद, लोढा प्लॉट, बार्शी, माढा शहर – कुर्डूवाडी नगरपरिषद नागरिक आरोग्य केंद्र, कुर्डवाडी, माळशिरस – माळशिरस नगरपंचायत नगरपंचायत इमारती आवार, माळशिरस, मंगळवेढा शहर – मंगळवेढा नगरपरिषद योग भवन नाका, मंगळवेढा, मोहोळ शहर – मोहोळ नगरपरिषद, दत्त मंगल हॉल, मोहोळ, पंढरपूर शहर – पंढरपूर नगरपरिषद, क्लॉक रूम, सांगोला नाका, पंढरपूर. सांगोला शहर – सांगोला नगरपरिषद जि. प. शाळा, चांदोलीवाडी, सांगोला.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे म्हणाल्या, ‘आपला दवाखाना’ मध्ये बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, 30 प्रकारच्या प्रयोग शाळा चाचण्या, मोफत‌ कार्यशाळा तपासणी, टेलि कन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण सेवा देण्यात येणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषत: संदर्भ सेवा, योगा व व्यायामबाबतीचे प्रात्यक्षिक देखील करण्यात येणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!