हिंद दी चादर कार्यक्रमाची चित्ररथाद्वारे प्रसिद्धी

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते चित्ररथाचे पूजन


सातारा – चित्ररथाचे पूजनप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील. त्यावेळी मल्लिकार्जुन माने, नागेश पाटील, सचिन वालवेकर, शिख, सिंधी, बंजारा तसेच वाल्मिकी समाजाचे पदाधिकारी.

स्थैर्य, 18 फेब्रुवारी, सातारा : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रम खारघर येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी होणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिध्दीच्या रथाचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते पुजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा क्षेत्रीय समन्वयक सचिन वालवेकर यांच्यासह शिख, सिंधी, बंजारा तसेच वाल्मिकी समाजाचे प्रमुख उपस्थित होते.

हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ऐतिहासिक शहिदीला 350 वर्ष पूर्ण होत असून या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून खारघर, नवी मुंबई (रायगड) या ठिकाणी दिनांक 28 फेब्रुवारी व 1 मार्च या दिवशी ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 1 मार्च रोजी होणार्‍या कार्यक्रमास जिल्ह्यातील समाज बांधवानी उपस्थित रहावे,असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!