महिलांच्या प्रगतीमधूनच समाजाची प्रगती साधण्यास मदत

योगेश कदम; वडूजला जिजाऊ - सावित्री निबंध, कविता लेखन पुरस्कारांचे वितरण


स्थैर्य, 27 मार्च, सातारा : महिलांमधील कलागुणांना वाव मिळणे आवश्यक आहे. समाजाने यादृष्टीने विचार करणे गरजेचे असून, महिलांच्या प्रगतीमधूनच समाजाची प्रगती साधण्यास मदत होईल, असे मत खटाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी व्यक्त केले.

संस्कृती कला मंचतर्फे आयोजित केलेल्या जिजाऊ सावित्री निबंध, कविता लेखन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी संस्कृती कला मंचचे अध्यक्ष यशेंद्र क्षीरसागर, बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षाराणी ओमासे, गट समन्वयक जमीर शिकलगार, विस्तार अधिकारी शिवराज मोहिते आदी उपस्थित होते.

यावेळी लीना कुंभार, प्रतीक्षा चव्हाण, सुप्रिया राऊत, सायलीमांडवे, निकिता गोरखे, विजया भोकरे, शुभांगी सावंत, अमृता कुंभार, सुजाताचन्ने, लैलाबी मुलाणी यांना उत्कृष्ट निबंध लेखनासाठी जिजाऊ सावित्री
पुरस्काराने गौरविण्यात आले. सुमय्या शेख, पूजा मांडवे, राधिका नलवडे, अबोली चोरमले, वहिदा पटवेकरी, राजश्री कदम यांना उत्कृष्ट कविता पुरस्काराने गौरविण्यात आले. ज्योती देशमुख, राणी तडाके यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले..

श्री. क्षीरसागर म्हणाले, अंगणवाडी सेविका, पंचायत समितीमधील महिला कर्मचार्‍यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून या स्पर्धांचे आयोजन करण्यात  आले होते. या लेखनाचे लवकरच हस्तलिखित तयार करण्यात येईल. व यावेळी श्रीमती ओमासे, सुजाता चन्ने यांनी मनोगत व्यक्त केले.मंगेश लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. गट समन्वयक जमीर शिकलगार यांनी स्वागत केले. अंगणवाडी पर्यवेक्षिका पूजा गायकवाड यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!