सातार्‍यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस


दैनिक स्थैर्य। 12 जून 2025। सातारा। गेले तीन दिवस संपूर्ण दिवसभर गोंधळ वातावरण आणि आभाळ भरून असलेल्या शहर परिसरामध्ये बुधवारी सायंकाळी रात्री उशिरा साडेआठ नंतर मुसळधार पावसाला जोराची सुरुवात झाली प्रचंड आवाजाच्या मेघगर्जनेसह आणि विजांचा कडकडाट होत या पावसाला सुरुवात झाल्यामुळे विजेचा लपंडाव सुरू झाला होता.

अवकाळी पावसाची ही चिन्हे नुकसान करणारी ठरत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सध्या बाजारपेठेत येत असलेला केशर हापूस लालबाग या आंबा उत्पादक शेतकर्‍यांना या पावसाचा जोरदार फटका बसत असून त्यामुळे झाडावरील अनेक कच्चे व पाडाला लागलेले आंबे संपूर्ण फळबागेमध्ये पडल्याचे चित्र दिसत होते त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे.

एकंदरीतच हा अवकाळी पाऊस उपयोगापेक्षा नुकसानग्रस्त ठरत आहे मागील महिन्यातही झालेल्या जोरदार पावसामुळे करोडोंचे झालेले नुकसान अद्याप पंचनामे न झाल्यामुळे शेतकर्‍यांना मिळाले नसतानाच आता मान्सूनच्या पावसाची अपेक्षा असताना या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसानाला सामोरे जावे लागत असल्याची चित्र आहे.

दरम्यान सातारा शहरात राजपथ आणि प्रमुख रस्त्यांवर या जोराच्या पावसामुळे पाण्याचे लोंढे वाहताना दिसून येत होते. अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांची दयना उडालेली दिसून येत होती. जोरदार विजांचा कडकडाटामुळे नागरिकाही भयभीत झालेले दिसून येत होते.


Back to top button
Don`t copy text!