दैनिक स्थैर्य । दि. १९ मार्च २०२३ । दापोली । दापोलीत शिवसेनेला जोरदार धक्का बसला असून आमदार योगेश कदम यांचे कट्टर समर्थक दापोली नगपंचायत माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुसाळकर यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने खेळ गोळीबार मैदान येथे जाहीर सभा ठेवली आहे. सभेच्या पूर्वसंध्येलाच शिवसेनेला हा मोठा झटका मानला जातोय.
दापोली नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी माजी आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तसेच शिंदे गटाकडून सतत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परिवारावर खालच्या थरावर टीका होत असल्याने त्याचा तीव्र शब्दात निषेध करत प्रवेश करत असल्याचे सांगितले.
या प्रसंगी माजी आमदार सुर्यकांत दळवी, दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई,तालुकाप्रमुख रूषीकेश गुजर, मा.बाधकाम सभापती विश्वास उर्फ काका कदम, नरेंद्र करमरकर, शहरप्रमुख संदीप चव्हाण, दापोली नगरपंचायत नगराध्यक्षा ममताताई मोरे, नगरसेविका नौसीन गिलगिले, नगरसेवक रविंद्र शिरसागर, नगरसेवक अझीम चिपळूणकर, युवासेना शहर अधिकारी प्रसाद दरीपकर, बिपिन मोरे, उमेश शिंदे, जिल्हा युवती समन्वयक भाग्यश्री चव्हाण, युवासेना सचिव साई मोरे, समन्वयक सायली गावडे, मंगेश गावडे, सुनिल साळवी, दत्ता भिलारे, अक्षय पाटणे तसेच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह महिला आघाडी युवसेना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.