
दैनिक स्थैर्य | दि. 23 जुलै 2025 । फलटण । तालुक्यातील राजाळे गावामध्ये वित्त आयोग आणि ग्रामपंचायत निधीमधून गावातील स्तनदा माता, गरोदर माता आणि अंगणवाड्यातील लहान मुलांना अतिरिक्त पोषण आहार देऊन त्यांच्या शरीरातील ऊर्जा तयार करणे कुपोषण नाहीसे करणे, नवजात बालक सुदृढ होण्यासाठी वितरित करण्यात आले. गरोदर माता व स्तनदा माता आणि अंगणवाडी बालकांना सकस पोषक आहार हा त्यांचा अधिकार आहे असे मत आमदार सचिन पाटील यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राजाळे येथे विशेष कार्यक्रमात कृतज्ञतापूर्वक पार पडला.
या योजनेचा प्रत्यक्ष विविध प्रथिने युक्त बाबींचे किटचे वाटप हे आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते राजाळे येथे हनुमान मंदिर मध्ये विशेष कार्यक्रमाद्वारे करण्यात आले.
यावेळी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे, युवा नेते तुकाराम शिंदे, राजाळेच्या सरपंच सौ. महिपाल, ग्रामसेवक गुरव, युवा नेते युवराज सस्ते तसेच ग्रामपंचायत सदस्य व राजाळे गावातील महिला व बालक बहुसंख्येने उपस्थित होते.