आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा इशारा- हिवाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते; सरकारचा व्हॅक्सीनच्या इमरजेंसी यूजवर अद्याप विचार नाही


 

स्थैर्य, दि.११: केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी सोशल मीडियावर संडे संवाद कार्यक्रमादरम्यान लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना सांगितले की, येत्या काळात फेस्टिवल आणि हिवाळ्यात कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा मोठे नुकसान करू शकतो. या वातावरणात संक्रमण वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वांनी सावध राहावे.

यावेळी त्यांनी कोरोना व्हॅक्सीनचे अपडेटही दिले. ते म्हणाले की, वेगवेगळ्या व्हॅक्सीनचे परीक्षण सध्या फेज-1, फेज-2, फेज-3 मध्ये सुरू आहे. याचे रिजल्ट अद्याप आले नाहीत. त्यामुळे कोरोना व्हॅक्सीनच्या इमरजंसी वापराचा विचार सरकारने अद्याप केला नाही.

हिवाळ्यात अनेकांना श्वसनाचा त्रास होतो

डॉ. हर्षवर्धन पुढे म्हणाले की, SARS Cov 2 एक रेस्पिरेट्री व्हायरस आहे आणि अशाप्रकारेच व्हायरस हिवाळ्याच्या वातावरणात वाढतात. हिवाळ्याच्या वातावरणात अनेक ठिकाणी लोक एकत्र येतात, यातून संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी ब्रिटेनचे उदाहरण दिले. ब्रिटेनमध्ये सर्दीच्या वातावरणात कोरोना संक्रमण वेगाने वाढले आहे.

पंतप्रधान मोदींच्या जनआंदोलनास गांभीर्याने घ्या

जगातील कोणताही धर्म किंवा देव असे म्हणत नाही की आपण लोकांच्या जीवाला धोक्यात टाकून उत्सव साजरा करा. कोरोनाविरूद्ध युद्ध जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या जनआंदोलनास आपण गांभीर्याने घेतले पाहिजे. आपण हा माझा इशारा किंवा सल्ला म्हणून घेऊ शकता, परंतु जर आपण सणांच्या वेळी दुर्लक्ष केले तर कोरोना पुन्हा खूप मोठा होईल. म्हणून मी म्हणेन की सणांच्या वेळी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचे नियम पाळले पाहिजेत. बाहेर जाण्याऐवजी घरी रहा आणि कुंटुंबासोबत उत्सव साजरा करा. शास्त्रज्ञांची एक उच्च समिती देशातील कोरोना लसीवर कार्यरत आहे. पुढच्या वर्षी जुलैपर्यंत ही लस उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. सर्वांना ही लस उपलब्ध करुन देण्याकडे सरकारचे लक्ष असेल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!