दैनिक स्थैर्य | दि. १९ जुलै २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील उद्यानकन्यांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, सोनवडी खुर्द येथे आरोग्य तपासणी शिबीर मंगळवार, दि. १६ जुलै २०२४ रोजी आयोजित केले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती शालन सूर्यवंशी, उपसरपंच शरद सोनवलकर, आरोग्य सेवक एस. बी. शिंदे आदी उपस्थित होते. डॉ. पी. बी. भोसले यांनी संतुलित आहार, बी. पी., साखर यावर माहिती दिली. नंतर आरोग्य तपासणीला सुरुवात केली. वजन, बी.पी., साखर, एच. बी. या सर्व गोष्टी तपासण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी सोनवडीमध्ये भरघोस प्रतिसाद मिळाला. गावच्या ग्रामस्थ सौ. सुजाता सोनवलकर यांनी डॉ. पी. बी. भोसले यांचा सत्कार करून आभार मानले. त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्षा श्रीमती शालन सूर्यवंशी यांनी उद्यानकन्या व उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला, असे जाहीर केले.
या उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा. जे. व्ही. लेंभे व समन्वयक प्रा. ए. डी. पाटील , कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी अभंगराव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या शिंदे स्नेहल, गोसावी क्रांती, गलांडे शिवानी, माळी अस्मिता, खराडे वर्षा, काशीद अमृता यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.