दैनिक स्थैर्य | दि. ३ मे २०२३ | फलटण |
व्यसनापासून जो लांब राहील तोच जीवनात यशस्वी होईल, तसेच ‘हे माझे ते माझे’ अशा गोष्टीमध्ये अडकला की, तुमचा आयुष्याचा मार्ग चुकेलं. आनंदी जीवन जगायचे असेल तर लहान मुलांकडे बघून जगा व यशस्वी होण्यासाठी वडीलधार्यांचे संस्कार आत्मसात करणे गरजेचे आहे, असे मत थोर व्याख्याते डॉ. जयंत करंदीकर यांनी व्यक्त केले.
बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटर आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त ‘कामगार भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘व्यसनमुक्ती व तणावमुक्ती व्यवस्थापन’ या विषयावर नवलबाई मंगल कार्यालय फलटण येथे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे, प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, भोजराज नाईक निंबाळकर, यशवंत खलाटे पाटील, अॅड.सागर सस्ते, संदीप कांबळे, बिल्डर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रणधीर भोईटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावर्षीचा ‘स्व. अशोकभाऊ शिंदे कामगार भूषण पुरस्कार’ सस्तेवाडीचे सुरेश मारुती सस्ते यांना सन्मानपूर्वक देण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, वृक्ष असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे, उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शिवाजी जगताप, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ साताराचे केंद्र संचालक संदीप कांबळे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
प्रास्ताविक बिल्डर असोसिएशनचे चेअरमन किरण दंडिले यांनी केले. आभार सचिव स्वीकार मेहता यांनी मानले.
यावेळी बिल्डर असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रमोद निंबाळकर, ला.बापूराव जगताप, व्हाईस चेअरमन सुनील सस्ते, खजिनदार संजय डोईफोडे, महेश गरवालिया, सागर शहा, राजेश शहा, उद्योजक बाबासाहेब सस्ते, आर्किटेक्ट महेंद्र जाधव, राजेंद्र कापसे, शफिक मोदी, माजी सरपंच रत्नकांत सस्ते तसेच बिल्डर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्य व विविध बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार मिस्त्री व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.