दैनिक स्थैर्य | दि. ०५ फेब्रुवारी २०२५ | फलटण | फलटण शहर पोलिस स्टेशनमध्ये नियुक्त असलेले पोलिस हवालदार अतुल सोनटक्के त्यांना शारीरिक त्रास होवू लागल्याने, त्यांना निकोप हॉस्पिटल येथे औषधोपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू होते. परंतु सकाळी ११.४७ वाजता त्यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. आज सायंकाळी ४ वाजता फलटण शहराच्या नजीक असणाऱ्या जाधववाडी (फ) येथील स्मशानभूमी येथे अंत्यविधी संपन्न होणार आहे.
पोलीस हवालदार बक्कल क्रमांक १९७६ अतुल सदाशिव सोनटक्के, मूळ राहणार नेले, केडगाव, तालुका सातारा, सध्या राहणार अन्नपूर्णा मंदिर शेजारी, जाधववाडी, फलटण हे सकाळी फलटण शहर पोलीस ठाणे येथे कर्तव्यास आले होते.