कष्टकरी कामगारांचा अनुबंध कला मंडळातर्फे सन्मान


दैनिक स्थैर्य । 20 मे 2025। फलटण । येथील अनुबंध कला मंडळातर्फे रविवार दि. 18 मे 2025 रोजी जोशी हॉस्पिटलच्या सभागृह येथे 50 वर्षाहून अधिक काळ उन्हातान्हात अखंडित कष्ट करणार्‍या दहा कामगारांचा शाल, पुष्पहार, मिठाई व आर्थिक भेट देऊन आगळा वेगळा सन्मान करण्यात आला.

रस्त्याच्या आसपास छोटी-मोठी काम करणारे, कष्ट करणारे कामगार, कुणी चर्मकार, कुणी केश कर्तनकार, कुणी बर्फाचे गोळे विकणारा, कुणी धार लावणारा… अशी अगदी साधीसुधी काम करणारी अनेक माणसे आपल्या गरजांना धावून येतात. गरजेच्या वेळी आपण त्यांच्याकडे जातो, काम करून घेतो, पण नंतर हे आपल्या खिजगणतीतही नसतात. अशा या कष्टकरी कामगारांचा सन्मान करून कृतार्थता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे त्यासाठीच अनुबंध कलामंडळाने साकारला उपक्रम साकारला आहे.

2024 साली अशा कामगारांचा सत्कार करण्याचा पहिला कार्यक्रम अनुबंध कलामंडळाने आयोजित केला होता. यावर्षी रविवार दि. 18 मे 2025 रोजी जोशी हॉस्पिटलच्या सभागृहात लक्ष्मण देशपांडे, प्रकाश मोहिते, रत्नाकर कासार,रोहिदास सोनवणे, राजेंद्र विष्णू माने , श्रीमती सुगंधा जगताप, गुलाब इनामदार, हनिफ तांबोळी, बळवंत पाटील आणि श्रीमती आशा दरेकर या दहा कष्टकरी कामगारांचा विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्रीमंत रामराजे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून दरवर्षी आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले. जोशी हॉस्पिटलचे डॉ. प्रसाद जोशी यांनी कार्यक्रमास सहकार्य केलेे.


Back to top button
Don`t copy text!