
दैनिक स्थैर्य । दि.०४ मे २०२२ । सातारा । एका अल्पवयीन मुलीला व तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केला. ही घटना दि. ३0 एप्रिल रोजी घडलाी. याबाबतची तक्रार मुलीच्या पालकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३० रोजी सातारा शहर परिसरातील एका फ्लॅटमध्ये शुभम ज्योतिराम पिसाळ वय २५, रा. पाडळी निनाम ता. सातारा याने एका अल्पवयीन मुलीला तू माझ्यासोबत लग्न केले नाहीस तर तुला व तुझ्या आई-वडिलांना जिवे मारून टाकीन, अशी धमकी देऊन तिचा विनयभंग केला.