
दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑक्टोबर २०२१ | सातारा | विजयादशमी म्हणजेच दसरा सणानिमित्त आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले दि. १५ रोजी सातारा- जावली मतदारसंघातील जनतेला शुभेच्छा देणार आहेत.
शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता आ. शिवेंद्रसिंहराजे हे सुरुची येथे पारंपरिक पद्धतीने आपट्यांची पाने देऊन नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देणार आहेत शुभेच्छांचा स्विकार करणार आहेत. यावेळी सातारा- जावळी मतदारसंघातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.