गिरवी प्रादेशिक योजनेच्या कर्मचार्‍यांची दिवाळी गोड..

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
गिरवी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत सहा गावांतील पाणीपुरवठा कर्मचार्‍यांची दिवाळी बोनस आणि मिठाई देऊन गोड करण्यात आली.

सहा गावांचा पाणीपुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी कर्मचार्‍यांची कायमच धडपड असते. दिवाळीच्या निमित्ताने योजना समितीच्या पदाधिकार्‍यांच्या संकल्पनेतून त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी बोनस आणि मिठाईचे वाटप पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. सचिन रणवरे, योजना समितीचे अध्यक्ष श्री. एम. एस. गुंजवटे सर, सचिव श्री. पी. बी. नाळे यांच्या हस्ते करण्यात आले. योजना समितीच्या वतीने नुकतीच ग्रामविकास अधिकारी म्हणून पदोन्नती झालेले झिरपवाडी गावचे श्री. पी. बी. नाळे तसेच सासकल गावचे श्री. अशोक मिंड यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमप्रसंगी वरील मान्यवरांसमवेत सासकलचे मा. सरपंच श्री. मोहनराव मुळीक, तिरकवाडी गावचे उपसरपंच श्री. नानासाहेब काळुखे, भाडळी बु.च्या मातोश्री विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. मोहनराव डांगे, झिरपवाडीच्या सरपंच सौ. वर्षाताई बोरकर, सोनवडी बु.चे सरपंच श्री. प्रवीण राऊत, भाडळी खुर्द चे मा. सरपंच श्री. सचिन पिसाळ तिरकवाडीचे ग्रामपंचायत अधिकारी श्री. सुरेश निंबाळकर यांच्यासह सहा गावांतील पाणीपुरवठा कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!