
दैनिक स्थैर्य । 17 मे 2025। फलटण । येथील सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व जुनियर कॉलेजचा दहावीचा निकाल 98.95 टक्के लागला आहे.
विद्यालयातील हेमंत संदिप कोळेकर याने 95.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. यश राजेंद्र राऊत याने 94.40 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला. संस्कृती दत्तू सरक हिने 93.40 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. एकूण 96 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्या पैकी 95 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, अध्यक्ष तुषार गांधी, सचिव अॅड. सौ. मधुबाला भोसले, संचालिका सौ. स्वाती फुले, प्राचार्य नागेश पाठक, मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण व शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले.