अण्णासाहेब पाटील महामंडळ बरखास्तीसाठी ‘राष्ट्रवादी’चा हात : नरेंद्र पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.१२: महायुती सरकारच्या काळात मराठा समाजाच्या समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाचा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळला होता. मात्र, सध्याचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाचे नुकसान झाले. त्यामुळे या पदावरून चव्हाण यांना हटवावे व एकनाथ शिंदे यांना समितीच्या अध्यक्षपदी नेमावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. यापुढे मराठा आरक्षणाची लढाई तीव्र करणार असून, अशोक चव्हाण आमच्या रडारवर असतील, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला.

पाटील यांनी मुंबईत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “”अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचे मी सोने करण्याचा प्रयत्न केला; पण मुख्यमंत्र्यांनी चर्चा न करता असा निर्णय घेतला. मी मांडत असलेली भूमिका अशोक चव्हाण यांना पटली नसावी. त्यातूनच हा प्रकार झाला असावा. नांदेडमध्ये मी त्यांच्याविरोधात भूमिका मांडली होती.

महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह संचालक मंडळाला बरखास्त करताना चव्हाण यांनी दबाव टाकला असेल किंवा राष्ट्रवादीनेही मागणी केल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सरकारच्या या निर्णयामुळे आता माझी भूमिका मी अधिक तीव्र करणार आहे. आता चव्हाण हटाव ही मागणी जोरदारपणे मांडणार आहे. त्यांच्या जागी एकनाथ शिंदे यांच्या निवडीची मागणी लावून धरणार आहे.”


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!