
स्थैर्य, सातारा, दि. ११: सातत्याने संघर्षाचा विचार , अन्यायाविरुद्ध आवाज उठवून कृती करणारे सातारचे माजी नगरसेवक हणमंतराव पवार यांनी आपल्या सामाजिक कामाचा ठसा कायम ठेवला आहे असे प्रतिपादन विविध वक्त्यांनी सातारा येथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना केले.
सातारा येथील माजी नगरसेवक व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हणमंतराव पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथील नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये हणमंतराव पवार मित्र मंडळाने शोकसभा आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष विजय देशपांडे होते विचारमंचावर विजय मांडके , अमर गायकवाड , हणमंतराव पवार यांच्या स्नुषा सौ.रजनी पवार होत्या.
शिवाजी राऊत म्हणाले की हणमंतराव पवार यांनी सरंजामशाहीशी तडजोड नकरता अनेक प्रश्नांवर आवाज उठवत कार्य केले. तो निर्भय वारसा व सार्वजनिक हितासाठी संघर्ष हे कार्य पुढे चालविणे हीच त्यांना श्रद्धांजली होय
अमर गायकवाड यांनी त्यांच्या स्मृती जपण्यासाठी दिवंगत हणमंतराव पवार आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रत्येक स्मृती दिनास क्रांती थिएटर च्या वतीने सुरू करणार असल्याची घोषणा केली.
राष्ट्र सेवादल व हरिजन सेवा संघाचे कट्टर समर्थक व निष्ठावंत अनुयायी होते. पवार कुटुंबीय त्यांचा हा विचार व सेवा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करेल असे हणमंतराव पवार यांच्या स्नुषा व सातारा जिल्हा काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या रजनी पवार यांनी या वेळी बोलताना सांगितले.
सातारा शहरात नगर पालिका राजकारणात पक्ष भेदाच्या पलीकडे जावून कार्यकर्त्यावर दिवंगत हणमंतराव पवार हे प्रेम करीत असत. त्यांना आदर देत असत.सभागृहात भूमिका कशा मांडाव्यात हे शिकवत असत. ते जिद्दीचे नेते होते.असे अनेकांनी यावेळी आदरांजली वाहताना सांगितले.
यावेळी प्रकाश बडेकर , श्रीरंग काटेकर , विजय नाफड , मश्चिंद्रनाथ जाधव , मुरलीधर भोसले ,प्रकाश गोसावी , हेमांगी जोशी , शिवाजी राऊत , गौतम भोसले , शंकर दळवी , Adv. बाळासाहेब बाबर , शाहीर प्रकाश फरांदे , जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब शिरसाट , डॉ. रवींद्र भारती- झुटिंग यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. त्यांनी हणमंतराव पवार यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
सुत्रसंचलन विजय मांडके यांनी केले. यावेळी डॉ.अच्युत गोडबोले , संजय शिंदे , राजन चतुर , इंतेखाब बागवान , शरद जाधव , संतोष साळुंखे , दिलिप भोसले , रावण गायकवाड , वैभव शिंदे , शाहीर भानुदास गायकवाड , बाबुराव बावकर आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

