बावो कौठुळी गावच्या मतदार यादीतील बोगस नावे कमी करण्यासाठी आटपाडी तहसीलसमोर हलगीनाद आंदोलन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ ऑक्टोबर २०२२ । आटपाडी । आटपाडी तालुक्यातील कौठुळी गावाच्या मतदार यादीत लावण्यात आलेली आक्षेपार्ह-बोगस नावे कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थांनी आटपाडी तहसील कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन केले.

माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, युवा नेते अनिलशेठ पाटील, ज्येष्ठ नेते श्रीरंगआण्णा कदम, वंचित बहुजन आघाडीचे नेते अरुणभाऊ वाघमारे, सरपंच गणपत मंडले, उपसरपंच नवनाथ कदम यांच्यासह मान्यवर व कौठुळी ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार बी.एस. माने यांनी उपस्थित राहून निवेदन स्वीकारले.

या आंदोलनामध्ये संजय कदम,उमाजी कदम,एम.पी.कदम,मारुती मगर,शंकर कदम ,महेश कदम, अतुल पाटील, संभाजी कदम, हनुमंत केंगार, रोहिदास केंगार, गोरख जरे,मंगेश कदम, युवराज कदम, रवींद्र मंडले, दीपक कदम, सचिन कदम, अजित कदम, डॉ.हनुमंत कदम, विश्वंभर कदम, अण्णासाहेब भोरे, आदींनी सहभाग घेतला.

आटपाडी तालुक्यातील कौठुळी येथील मतदारांची मतदार यादी १३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये कौठुळी गावामध्ये रहिवाशी नसणाऱ्या व्यक्तींची नावे आढळून आल्याचे ज्येष्ठ नेते श्रीरंग कदम, सरपंच गणपत मंडले,उपसरपंच नवनाथ कदम यांच्या लक्षात आले.

गावातील अल्पवयीन मुलांची नावे, कौठुळी गावाचा काहीही संबंध नसताना कोणत्या कागदपत्राच्या आधारे व कोणत्या व्यक्तीने, कोणत्या एजन्सीने ही नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट केली, याची सखोल चौकशी करावी व त्या व्यक्तींवर व एजन्सीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा याची अशी मागणी सरपंच, उपसरपंच यांनी तहसीलदार यांच्याकडे केली होती. तसेच त्या एजन्सीवर किंवा व्यक्तींवर फौजदारी गुन्हाही दाखल करण्याची मागणी केली होती. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता.

कौठुळी गावातील काही ग्रामस्थांसह सरपंच, उपसरपंच यांनी तहसील कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन केले. ही नावे १ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या मतदार यादीत नव्हती. परंतु १३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये समाविष्ट आहेत. यावर त्यांनी आक्षेप घेऊन नावे कमी करण्यासंदर्भात जोरदार आंदोलन केले. ही नावे या यादीतून कमी न झाल्यास प्रांताधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्याचा इशारा या हलगीनाद आंदोलनावेळी व्यक्त केला.
युवा नेते अनिलशेठ पाटील, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते अरुण वाघमारे, उपसरपंच नवनाथ कदम यांनी आंदोलनावेळी आपले मत व्यक्त केले.

खानापूर विभागाचे उपविभागीय अधिकारी संतोष भोर, आटपाडीच्या तहसीलदार बी.एस.माने यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. प्रांताधिकारी संतोष भोर यांनी प्रशासनाच्यावतीने आपले मत मांडले.


Back to top button
Don`t copy text!