सौ. जिजामाला निंबाळकर यांच्या निवासस्थानी हळदी-कुंकू समारंभ संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २३ जानेवारी २०२५ | फलटण |
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे निवासस्थानी राजभवन येथे २१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत अ‍ॅड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हळदी-कुंकू समारोह आयोजित केला होता. या कार्यक्रमात भडकमकर नगर, स्वामी विवेकानंद नगर, संजीवराजे नगर, हडको वसाहत, गोळीबार मैदान, आनंदनगर, स्टेट बँक कॉलनी, लक्ष्मीनगर, माळजाई मंदिर समोरील परिसर, बारव बाग, महाराजा मंगल कार्यालय परिसर, विद्यानगर, निर्मलादेवी टेकडी परिसर या ठिकाणच्या महिला भगिनी हजारोच्या संख्येने सहभागी झाल्या. यावेळी महिला भगिनींना वाण म्हणून साखर वाटप करण्यात आली.

या कार्यक्रमास सौ. मनिषा समशेरसिंह नाईक निंबाळकर, सौ. गौरी सचिन पाटील यांचेसह तालुका व शहरातील विविध मान्यवर महिला उपस्थित होत्या.

यावेळी स्वराज फाउंडेशनच्या वतीने वाटण्यात आलेल्या कूपनचा लकी ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये ४२ महिलांना मानाच्या ओटीचा सन्मान प्राप्त झाला आहे. या सौभाग्यवतींना हा सन्मान सौ. जिजामाला नाईक निंबाळकर स्वतः त्यांच्या घरी जाऊन देणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!