नांदेडमधील शंकर नागरी सहकारी बँकेवर हॅकरचा दरोडा, तब्बल 14 कोटी रुपये दुसऱ्या खात्यात केले वर्ग


स्थैर्य, नांदेड, दि.६: नांदेडच्या शंकर नागरी सहकारी बँकेवर हॅकरने दरोडा टाकत 14 कोटी रुपये लुटल्याची घटना समोर आली आहे. एका हॅकेरने बँकेतील खात्यामधून 14 कोटी 46 लाख 5 हजार 347 रुपये दुसऱ्या खात्यात संशयास्पद रित्या वर्ग केले. 2 जानेवारी रोजी ही घटना बँक व्यवस्थापनाला समजली. हॅकरने NEFT आणि RTGSद्वारे बँकेला चुना लावला. याप्रकरणी वजीराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. सायबर सेलकडून या घटनेची चौकशी केली जात आहे. सध्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना याबाबत माहिती देण्यास नकार दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!