दैनिक स्थैर्य । दि. २७ मार्च २०२२ । बारामती । येथील जिल्हा क्रीडा संकुलात बारामती जिम्यास्टिक आणि मलखांब अकॅडमीच्या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील सौ. विशाखा हनुमंत पाटील यां दांपत्याच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे ,नगरपरिषद चे मुख्यधिकारी महेश रोकडे,उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, प्रशिक्षक डॉ. कैलाश मांटे संयोजक श्री.निशांत गवळी श्री.अभिमन्यू इंगोले श्री.दत्ता चव्हाण दादा आव्हाड मोठ्या संख्याने क्रीडा प्रेमी,प्रशिक्षक,विध्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी हनुमंत पाटील यांनी बारामतील जिल्हा क्रीडा संकुलातील सुविधांचा बारामतीकरांनी व बारामतीच्या परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे अवाहन केले तर जगन्नाथ लकडे साहेब यांनी उपस्थितांना क्रीडा संकुलातील विविध उपलब्ध सुविधांची माहिती दिली . बारामतीत प्रथमच जिम्यास्टिक आणि मलखांब या खेळाचे प्रशिक्षण सुरुवात होत असल्याची घोषणा लकडे यांनी केली. प्रशिक्षक डॉ. मांटे यांनी भारतातील आणि महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ मलखांब हा शारिक ऊर्जा आणि चपळता यासाठी मलखांब याखेळाची उपयुक्तता सांगितली. तसेच खेळाची जननी म्हणून प्रसिद्द असलेल्या जिम्यास्टिक या खेळाची लवचिकता आणि शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्तता सांगितली आभार रवींद्र कराळे यांनी मानले.