स्थैर्य, कराड (जि. सातारा), दि.२० : बंदी असतानाही सुमारे साडेतीन
लाखांचा गुटखा विक्रीस नेताना जप्त झाला आहे. त्यात सातारा येथील दोन
युवकांना अटक झाली आहे. वैभव रविंद्र पावसकर (वय 31) व ओंकार अरूण देशपांडे
(30, दोघे रा. शनिवार पेठ सातारा) अशी त्यांची नावे आहेत. सातारा येथील
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तासवडे टोलनाक्यावर पहाटे तीनच्या सुमारास
कारवाई केली.
पोलिसांनी सांगितले की, कर्नाटकातून काही युवक गुटखा विक्रीस येणार आहेत.
त्याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळाली.
त्यानुसार त्यांनी पहाटे तीनच्या सुमारास तासवडे येथे सापळा रचला.
त्यानुसार कऱ्हाड बाजूने चारचाकी वाहन आले. संशय आल्याने पोलिसांनी ती
अडवले. सुरूवातील उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, नंतर त्यांनी गाडीतील
गुटखा असल्याचे कबुल केले.
संबंधित दोन्ही युवक सातारा शहरातील शनिवार पेठेतील आहेत. वैभव पावसकर व
ओंकार देशपांडे अशी त्यांची नावे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कारवाईत
पोलिसांनी साडेतीन लाखांचा गुटखा जप्त केला. तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत
महामार्गावर टोलनाक्यावर एका हॉटेल समोर कारवाई झाली. त्यात गुटखा वाहतूक
करणाऱ्या वाहनावर छापा टाकला. त्यात सुमारे साडेतीन लाखांचा गुटखा व तीन
लाखांचे वाहन असा मिळून सहा लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.