सातार्‍यात गुरुवर्य करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन


दैनिक स्थैर्य । 12 मे 2025। सातारा । – सातार्‍यात श्री शिवाजी उदय मंडळाचे संस्थापक गुरुवर्य बबनराव उथळे यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त दि. 18 व 19 में रोजी गुरुवर्य चषक राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गोपाळराव माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेचे उद्घाटन खा. उदयनराजे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बावेजी मुख्याधिकारी अभिजित बापट उपस्थित राहणार आहेत, असे मंडळाचे सचिव शिवप्रसाद उथळे यांनी सांगितले,

गोपाळराव माने म्हणाले, शिवाजी उदय मंडळाचे संस्थापक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, क्रीडा महर्षी, गुरूवर्य त. स. तथा बबनराव उथळे यांच्या 99 व्या जयंती निमित्त गुरुवर्य चषक भव्य राज्यस्तरीय पुरुष निमंत्रित कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धे त राज्यातील 12 नामवंत संघाचा सहभाग आहे. स्पर्धेसाठी एकूण सव्वा लाखाची बक्षिसे रोख रक्कम स्वरूपात विजेत्या संघांना चषक चषक व व उत्कृष्ट खेळाडूंना देण्यात येणार आहेत. यामध्ये अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि प्रो कबड्डीमध्ये सहभाग असणार्‍या खेळाडूंचा खेळ पाहण्याची पर्वणी सातारकर क्रीडा रसिकांना मिळणार आहे.

गुरुवर्य बबनराव उथळे यांनी आपले आयुष्य क्रीडा सेवेसाठी समर्पित केले होते. 80 वर्षांची क्रीडा व सांस्कृतिक परंपरा असलेल्या श्री शिवाजी उदय मंडळाच्या माध्यमातून गुरुवर्य आण्णांनी आजवर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले. मंडळाने आजवर आण्णांच्या मार्गदर्शनाखाली 7 खेळाडूंनी शिवछत्रपती पुरस्कार मिळवले आहेत. राष्ट्रपती पुरस्कार 2, जिल्हा क्रीडा पुरस्कार 3. आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2 मिळविले आहेत. संस्थेच्या जिल्ह्यात शिवथर, वळसे तर पुणे जिल्ह्यात चिंचवड आणि लोणावळा या ठिकाणी शाखा कार्यरत आहेत. आण्णांनी सुरू केलेले हे कार्य अविरत सुरु राहील या दृष्टीकोनातून या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या गुरुवर्य चषक स्पर्येचे उद्घाटन रविवार, दि. 18 रोजी सायंकाळी 7वाजता मंडळाच्या क्रीडांगणावर होणार आहे. या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा लाभसातारा शहरातील क्रीडा रसिकांनी घ्यावा असे आवाहन मंडळाचे सचिव शिवप्रसाद उथळे यांनी केले आहे.
या स्पर्धेमध्ये एस. एम. पटेल नदिड, इच्छाशक्ती क्रीडा मंडल पालघर, सतेज संघ बाणेर, अंबिका सेवा मंडळ मुंबई उपनगर, जयंत स्पोटर्स बलब इस्लामपूर, आझाद टाकळीचाण हिल्यानगर, स्वस्तिक संघ मुंबई उपनगर, भैरवनाथ भोसरी पुणे, शिवमुद्रा कौलव कोल्हापूर, न्यू हिंद विजयी चिपळूण, मावली क्रीडा मंडल ठाणे, साई सेवा मंडळ छत्रपती संभाजी नगर जादी संघांनी सहभाग घेतला आहे. त्यात निलेश काळ मेरे, विराज लांडगे, शिवछत्रपती पुरस्कार विजेता तेजस पाटील, किरण मगर, शैलेश गराळे, अक्रम शेख, अक्षय भरडे, शुभम पाटील, महादेव उगार, विश्वजीत घाडगे, ओम शिर्के, अमरसिंग कक्षप, यश निंबाळकर, कृष्णा पवार, राहुल डेके, साहिल पाटील, राज जयस्वाल, सुमित कदम, धीरज बेलमारे, वैभव मोरे, अल्केश चव्हाण यांचा सहभाग आहे.


Back to top button
Don`t copy text!