गुणवर्याच्या प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कुलमध्ये गुरूपौर्णिमा व बेंदुर उत्साहात साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२२ । फलटण । तालुक्यातील गुणवरे येथील विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर असणार्या सरस्वती एज्युकेशन सोसायटी संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कुलमध्ये गुरूपौर्णिमा व बेंदुर सण उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थेचे सचिव विशाल पवार, संचालिका सौ. संध्या गायकवाड, मुख्याध्यापिका सौ. प्रियंका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूपौर्णिमा व बेंदुर सण उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रियांका नाझीरकर यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!