स्थैर्य, दि.५: शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने सोमवारी स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रॉसिजर (एसओपी) जाहीर केली. यानुसार सुरुवातीच्या दोन-तीन आठवडे मुलांचे मूल्यांकन होणार नाही. तसेच, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य आणि भावनिक सुरक्षेकडेही शाळेला लक्ष द्यावे लागेल. आरोग्याच्या दृष्टीने शाळेत इमरजेंसी केअर टीम बनवावी लागेल आणि पालकांच्या परवानगीनंतरच मुलांना शाळेत बोलवले जाईल.
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले की, गृह मंत्रालयने राज्यांवर निर्णय सोपवला आहे की, राज्यातील परिस्थिती पाहून त्यांनी शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा. कोणत्याच मुलाला बळजबरीने शाळेत बोलवले जाणार नाही. तसेच, मुलांची जबाबदारी सर्वस्वी शाळेवर असेल.
शाळेकडे कोणती जबाबदारी असेल ?
संपूर्ण कँपसमध्ये स्वच्छता आणि डिसइन्फेक्शनिंगची व्यवस्था करावी लागेल. फर्नीचर, इक्विपमेंट, स्टेशनरी, स्टोअर, पाण्याच्या टाक्या, किचन, कँटीन, वॉशरूम, लॅब आणि लायब्रेरीची स्वच्छता आणि डिसइन्फेक्शनिंग करावी लागेल. तसेच, इनडोअर स्पेसमध्ये मोकळ्या हवेसाठी जागा करावी लागेल.
इमरजंसी केअर सपोर्ट/रेस्पॉन्स टीम, जनरल सपोर्ट टीम, कमोडिटी सपोर्ट टीम, हायजीन इन्सपेक्शनसारख्या कामांसाठी टास्क फोर्स बनवावी लागेल.
सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना शाळेत असेपर्यंत मास्क घालावे लागेल.
सेफ्टी प्रोटोकॉल, सोशल डिस्टेंसिंगशी संबंधित सायनेज आणि मार्किंग्स लावाव्या लागतील.
सर्व वर्गांसाठी अॅकेडमिक कॅलेंडरमध्ये बदल केले जातील.
विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी रेग्युलर हेल्थ चेकअपची व्यवस्था असावी.