
स्थैर्य, दि.१५: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय राजमाची ता.कराड येथे चतुर्थ वर्षातील विदयार्थिनी कु . शिल्पा भिमदेव बेलदार हिने प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांना विविध शेती उपयोगी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करत आहे . कृषी उत्पादन वाढीमध्ये बीज प्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे . जमिनीतून व बियानाद्वारे पसरणारे रोग व किडींचा पीकांवरील प्रार्दुभाव कमी करुन पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी बीज प्रक्रिया हे कमी खर्चाचे अत्यंत प्रभावी साधन आहे . हे पटवून देण्यासाठी शिल्पा बेलदार यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटून प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली , सध्याच्या कोरोना विषाणूच्या काळामध्ये हा कृषी कार्यक्रम योग्य पद्धतीने राबविण्याच्या सूचना प्राचार्य सचिन शिंदे सर यांनी दिल्या आहेत . प्रा . माने सर , प्रा काटे सर तसेच सर्व विषय तज्ञ यांचे मार्गर्शनाखाली सर्व प्रात्यक्षिके व्यवस्थित केली जात आहेत .